येरवड्यातील जागेचा निर्णय शासनाचा , माझा संबंध नाही

 येरवड्यातील जागेचा निर्णय शासनाचा , माझा संबंध नाही

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुण्यातील येरवडा तुरुंगापरिसरात असणाऱ्या पोलिसांच्या जागेबाबतचा निर्णय शासनाने नेमलेल्या समितीने घेतला होता त्याच्याशी माझा संबंधच नाही असे स्पष्टीकरण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिले.

ही जमीन आजही गृहखात्याच्या ताब्यात आहे त्यामुळे त्याबाबत चौकशी करण्याचे प्रयोजनच नाही असेही पवार यांनी सांगितले. या जागेबाबत सन २००८ साली शासनाने सहा जणांची समिती नेमली होती , मी त्यावेळी पुण्याचा पालकमंत्री होतो , सदर समितीने निर्णय घेतला तो शासनाने स्वीकारला मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची बाब माझ्यासमोर पालकमंत्री म्हणून माझ्यासमोर आणली गेली होती. त्यामुळे केवळ संबधित आयुक्त मीरा बोरवणकर यांच्याकडे आपण विचारणा केली होती. मात्र त्यांनी यावर नकारात्मक भूमिका घेतल्यावर तो विषय आपण सोडून दिला असेही पवार यांनी सांगितले.

मी शासनाचे आर्थिक नुकसान कधीही होऊन दिलेले नाही. नेमके आताच हे आरोप का झाले , त्यासाठी टायमिंग कसे साधले हे पत्रकारांनी शोधून काढावे . मात्र बोरवणकर यांनी विरोध केला म्हणून ते काम झाले नाही यात काहीही तथ्य नाही. तत्कालीन महसूल विभागीय आयुक्तांनी यावर सविस्तर खुलासा केला आहे त्यामुळे सर्व बाबी लोकांसमोर आल्या आहेत असे अजित पवारांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

याबाबत तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात शासनाचा आणि पोलीस खात्याचा फायदा होईल असे समितीचे मत होते असे त्यावेळच्या विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. हे मत समितीचे होते , माझे नाही , माझी कुठेही सही देखील नाही , मी या समितीची नेमणूक ही केलेली नाही, मग हे प्रकरण आताच का बाहेर आले याचाही विचार व्हायला हवा असे अजित पवार यांनी सांगितले. The decision of the seat in Yerwada is not related to the government

ML/KA/PGB
17 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *