जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

 जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

पॅरिस, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात वृद्ध महिला  फ्रेंच नन सिस्टर आंद्रे यांचे काल  वयाच्या 118 व्या वर्षी निधन झाले.  जगातील सर्वात वृद्ध महिला म्हणून त्यांची गिनीज बुक मध्ये नोद करण्यात आली होती. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी झाला होता. 25 दिवसांनंतर त्या 119 वर्षांच्या झाल्या असत्या.

फेब्रुवारी 2022 मध्ये, त्या 118 वर्षांची झाल्या होत्या. तेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांना हस्तलिखित वाढदिवसाच्या शुभेच्छांची नोट पाठवली होती. सिस्टर आंद्रे यांनी आपल्या आयुष्यात फ्रान्सचे 18 राष्ट्राध्यक्ष पाहिले. त्याच वेळी, कॅथोलिक चर्चमध्ये 10 पोप बदलताना त्यांनी पाहिले.

आंद्रे यांनी आपले बहुतेक आयुष्य धार्मिक कार्य आणि समाजसेवा करण्यात घालवले. कॅथोलिक नन होण्यापूर्वी त्यांनी दुसऱ्या महायुद्धात निराधार मुलांची काळजी घेतली. त्यानंतर 28 वर्षे त्यांनी रुग्णालयातील वृद्ध आणि अनाथ मुलांना आधार दिला. त्या जगातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या नन देखील आहेत

SL/KA/SL

18 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *