जगातल्या सर्वांत सुंदर स्त्रीचे निधन

 जगातल्या सर्वांत सुंदर स्त्रीचे निधन

रोम,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विसाव्या शतकातील मोनालिसा आणि जगातील सर्वांत सुंदर स्त्री अशी ख्याती असलेल्या प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा (९५) यांचे निधन झाले आहे.  १९५० आणि ६० च्या  दशकात युरोपियन सिनेसृष्टीत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.त्याकाळातील युरोपियन चित्रपटातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्या ओळखल्या जायच्या. जिना यांनी त्यांच्या अभिनयाने जगभरात आपला ठसा उमटवला.

दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीमध्ये चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या कायमच प्रसिद्धीझोतात पाहायला मिळाल्या. ‘लोलो’ हे जीना लोलोब्रिगिडा यांचे  टोपणनाव  होते.  बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने  यांच्या नावावरुन प्रभावित होत स्वत:ला लोला असे टोपणनाव घेतले.

जीना  यांनी आंतरराष्ट्रीय अन्न  आणि कृषी संस्थेच्या FAO सदिच्छा दूत (Good Will Ambassador11) म्हणून काम पाहीले होते.

जीना लोलोब्रिगिडा FAO च्या कार्याच्या समर्थक होत्या आणि भुकेविरुद्धच्या लढ्याला समर्पित होत्या. त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि चाहत्यांना आमच्या हार्दिक संवेदना.

अशा शब्दांत FAO ने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

SL/KA/SL

17 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *