मालेगावच्या कोर्टाने सुनावली आगळी वेगळी सजा

 मालेगावच्या कोर्टाने सुनावली आगळी वेगळी सजा

मालेगाव, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालेगावमधील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयानं एका तीस वर्षीय एका ऑटोरिक्षा चालकाला मुस्लिम तरुणाला एक आगळीवेगळी शिक्षा सुनावली आहे. मशिदीच्या परिसरात दररोज दोन झाडं लावण्यास आणि दिवसातून पाच दिवस नमाज पठण पुढील २१ दिवस करण्याचे आदेश दिले. न्यायदंडाधिकारी, तेजवंत संधू यांनी दिलेल्या या शिक्षेची सर्वत्र चर्चा होत आहे.

काय आहे शिक्षेचे कारण

रऊफ खान उमर खान हा 30 वर्षीय व्यक्ती ऑटोरिक्षा चालक असून, याच्या ऑटोने 2010 मध्ये मालेगाव शहरातील एका अरुंद गल्लीत थांबलेल्या दुचाकीला धडक दिली होती. तक्रारदाराने त्याला याबाबत विचारणा केल्यानंतर खानने त्याला मारहाण केली. त्यानंतर तक्रारीनंतर खानवर भारतीय दंड संहितेच्या कलम 323 , 325 , 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी कलम 323 अन्वये खान दोषी असल्याचा न्यायदंडाधिकार्‍यांनी निर्णय दिला, तर उर्वरित गुन्ह्यांमधून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खानला दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर तुरुंगवास आणि दंड न करता निर्दोष मुक्त करण्यात आले.

न्यायाधिश काय म्हणाले

न्यायदंडाधिकारी, तेजवंत संधू यांनी याबाबत मत मांडताना सांगितले की, प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स ऍक्ट, 1958 च्या कलम 3 ने दंडाधिकार्‍यांना सूचना किंवा योग्य ताकीद दिल्यानंतर सोडण्याचा अधिकार दिला आहे, जेणेकरून त्याने गुन्हा पुन्हा करू नये. परंतु यावेळी न्यायालयाने असेही तर्क दिला की केवळ समज पुरेशी होणार नाही, दोषीला समज लक्षात राहणेही आवश्यक आहे. जेणेकरून तो त्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करू नये.

SL/KA/SL
1 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *