पुढील महिन्यात येणार देशातली पहिली Solar Car
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील संशोधनाला सध्या मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे.पेट्रोल, डिझेलच्या सातत्याने वाढत दरांना कंटाळलेल्या ग्राहकांनी आपला मोर्चा आता EV कडे वळवला आहे. यामध्ये अजून अत्याधुनिकता आणणारी देशातील सोलार पॉवरवर धावणारी पहिली कार नवीन वर्षात बाजारात दाखल होणार आहे. पुणे स्थित कंपनी वेवे मोबिलिटी जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये भारतातील पहिली सोलर कार EVA चे अनावरण करणार आहे.
Vayve Mobility आपली पहिली सोलर कार EVA भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये सादर करणार आहे. हा एक्स्पो 17 ते 22 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की Wayway Eva ची किंमत देखील कमी असेल आणि या कारला चालवण्यासाठी फक्त 0.5 रुपये प्रति किलोमीटर खर्च येईल.
मोबिलिटीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये EVA हे मॉडेल सादर केले होते. शहरांच्या गरजा लक्षात घेऊन ईव्हीएची खास डिझाइन करण्यात आली आहे. ट्रॅफिक, पार्किंगची समस्या आणि महागडे पेट्रोल यांचा त्रास टाळण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. ही कार सौरऊर्जेवर वर्षभरात 3000 किलोमीटरचा प्रवास फ्री करते. या कारच्या हाय-व्होल्टेज टेक्नीकमुळे, ही कार खूप लवकर चार्ज होते. ही कारफक्त 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 50 किलोमीटरची अतिरिक्त रेंज देते.
SL/ML/SL
27 Dec. 2024