या राज्यात लाँच झाला देशातील पहिला सरकारी OTT

 या राज्यात लाँच झाला देशातील पहिला सरकारी OTT

तिरुवनंतपुरम्, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या सर्वांगिण विकासात नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या केरळ राज्यात आता देशातील पहिला OTT प्लॅटफॉर्म सुरु झाला आहे. स्वस्त सरकारी इंटरनेटनंतर आता केरळ सरकार स्वत:चा ओटीटी (ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिस) प्लॅटफॉर्म काल लाँच केला. तीन वर्षांच्या प्रयत्नांतून तयार झालेल्या या प्लॅटफॉर्मचे नाव ‘सी-स्पेस’ C- Space आहे. तो तयार करणारे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व प्रसिद्ध चित्रपट निर्माते शाजी एन. कारुन म्हणाले, सी-स्पेसद्वारे राज्याची संस्कृती केरळसह जगभरातील ६४ लाख मल्याळींपर्यंत पोहोचेल. हे ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. सुरुवातीला यामध्ये राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ४२ चित्रपट असतील.

चित्रपट दिग्दर्शक शंभू पुरुषोत्तम म्हणाले, सी-स्पेस ३ महिने मोफत असेल. त्यानंतर ‘पे पर व्ह्यू म्हणजे पीपीव्ही’ मॉडेलवर चालेल. यात प्रत्येक चित्रपटाचा रेंट ७५ रुपये राहील आणि केवळ मल्याळम चित्रपट दिसतील. कमाई चित्रपट निर्माते व प्लॅटफॉर्म प्रमोटर्समध्ये ५०-५० विभागली जाईल. राज्याचा सांस्कृतिक याची देखरेख करेल. प्लॅटफॉर्मवर जाहिरीतीही स्वीकारल्या जातील.केरळ सामान्य लोकांसाठी नावीन्यपूर्ण गोष्टी करण्यात सर्वात पुढे आहे. १९७० मध्ये येथे ‘केल्ट्रॉन’ नावाची कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक योजना आली. यात टीव्ही, फोन घरोघरी पोहोचवले.सध्या १५०० कोटींचा के-फोन प्रकल्प सुरू आहे.यात १४ हजार गरीब कुटुंबांना दरमहा २९९ रुपयांच्या हिशेबाने २० एमबीपीएसची स्पीड असलेले सरकारी इंटरनेट मिळत आहे. यात २० लाख कुटुंबांना जोडायचे आहे.

२०३० पर्यंत ३० हजार कोटींचे होईल ओटीटी मार्केट… जगाच्या तुलनेत भारतामध्ये ओटीटी व्यवसाय सर्वात तेजीने वाढत आहे. २०२२ मध्ये हे मार्केट १०,५०० कोटींचे होते. २०३० मध्ये ३० हजार कोटींचे होईल.तिरुवनंतपुरमच्या केटीसीटी सरकारी शाळेत गुरुवारी देशातील पहिली एआय शिक्षिका ‘आयरिस’ लाँच करण्यात आली. ती नीती आयोगाच्या एटीएल प्रकल्पांतर्गत मेकरलॅब्ज एज्युटेक प्रा. लि. ने बनवली आहे. ती तीन भाषांत सर्व विषय शिकवण्यात सक्षम आहे.​​​​​​​

SL/KA/SL

8 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *