जेएनपीटी चालविणार देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी
मुंबईत धावण्यासाठी देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता सज्ज झाली आहे. महत्वाचं म्हणजे, ही आधुनिक वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी बंदरादरम्यान चालविण्यात येणार आहे. ही टॅक्सी जेएनपीटी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी प्रमुख साधन ठरणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) व जेएनपीटी यांच्यातील करारानंतर पुढील महिन्यापासून ही सेवा सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.