देशातील पहिली ऑटोनॉमस इलेक्ट्रीक स्कूटर

 देशातील पहिली ऑटोनॉमस इलेक्ट्रीक स्कूटर

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : OLA कंपनी सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक स्कूटरची नवनवीन अत्याधुनिक मॉडेल्स आणत आहे. OLA इलेक्ट्रिकचे नवीन मॉडेल ओला सोलो समोर आले आहे, कंपनीने ओला इलेक्ट्रिकच्या साइटवर ओला सोलोशी संबंधित व्हिडिओ शेअर करून लोकांना या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली आहे. हे स्पीडबंप शोधण्यात आणि ट्रॅफिक 100 टक्के नेव्हिगेट करण्यात सक्षम असेल. तसेच, ओला ॲपच्या मदतीने, कोणीही ओला सोलोवर सहजपणे राइड करू शकतो. ही स्कूटर बनवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी कंपनीच्या या नवीन मॉडेलची माहिती शेअर केली. ओलाने याला देशातील पहिली ऑटोनॉमस इलेक्ट्रिक स्कूटर म्हटले आहे. कंपनीने याला रिवोल्यूशन असेही म्हटले आहे.

ओला सोलोमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरून अनेक उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर्स ओला इलेक्ट्रिक मॉडेलला सध्या बाजारात असलेल्या सर्व स्कूटरपेक्षा वेगळे बनवते. ही स्कूटर चालकविरहित असणे हे या क्षेत्रातील मोठे पाऊल आहे. ओला सोलोचा प्रत्येक भाग आणि तंत्रज्ञान ओलानेच विकसित केले आहे.

SL/ML/SL

2 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *