देशातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात या ठिकाणी

 देशातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात या ठिकाणी

AI

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI तंत्रज्ञानाच्या उपयोजनाबद्दल सध्या देशात सर्वत्र कुतूहलाचे वातावरण असताना या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची एक संधी उपलब्ध होत आहे. मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेल्या कर्जत या ठिकाणी देशातील पहिले AI तंत्रज्ञान विद्यापीठ होऊ घातले आहे.
या विद्यापीठाली महाराष्ट्र सरकारच्या उच्च तांत्रिक आणि शिक्षण विभागाने मान्यता मिळाली आहे. युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (Universal AI University) या विद्यापिठामध्ये 1 ऑगस्टपासून पहिलं शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे.

युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (Universal AI University) एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञानातील विशेष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम (Specialised Courses) सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना AI तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती आणि शिक्षण दिलं जाईल. यामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी आणि सुपर कॉम्प्युटरचे शिक्षण दिलं जाणार आहे. या मुंबई विद्यापिठात AI तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हायटेक क्लास रूम्स, सुपर कॉम्प्युटर आणि व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे अशी वेगवेगळी तयारीही करण्यात आली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे जग बदलेल असं म्हटलं जातं. त्यामुळे एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात या पहिल्या AI विद्यापिठाची स्थापना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

SL/KA/SL

27 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *