देशाची अर्थव्यवस्था साडेसहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज
नवी दिल्ली,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या (1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023 प्रसिद्ध केला.
र्थिक पाहणी अहवाल २०२२-२३ मध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जीडीपी ग्रोथ रेट ६ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.तर चालू आर्थिक वर्षातील विकास तर ७ टक्के असेल असा अंदाज आहे गेल्या ३ वर्षातील ही सर्वात कमी वाढ असेल. तर नाॅमिनल जीडीपी अंदाजे ११% आहे. कोविड काळातील नकारात्मक वाढीच्या अंदाजानंतर सगळ्यात कमी वेगाने अर्थव्यवस्थेची वाढ २०२३-२४ या वर्षासाठी नोंदवण्यात आली आहे.
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, भारत ग्राहक खरेदी संवेदनशीलचेच्या (पीपीपी) दृष्टीने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि विनिमय दराच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे.
अर्थमंत्री उद्या आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असल्याने हा मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असेल.
SL/KA/SL
31 Jan. 2023