बारावीचा पेपर फुटी प्रकरणी गुन्हा दाखल..

बुलडाणा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात काल बारावी गणिताचा पेपर सुरू होण्याच्या अगोदरच फुटला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला होता. The Class XII paper filed a crime in case.
त्यानंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली असून सिंदखेड राजा पोलिसांत शिक्षण विभागाने तक्रार दखल केल्यावर अज्ञात आरोपी विरुध्द महाराष्ट्र विद्यापीठाच्या , मंडळाच्या व इतर वी निर्दिष्ट परीक्षा मध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 कलम 2 आणि 6 नुसार गुन्हा दाखल केलाय.
हा गुन्हा साखरखर्डा हद्दीत असल्याने साखरखेर्डा पोलिसांकडे सुद्धा वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ML/KA/PGB
4 Mar. 2023