नवरात्र उत्सवात डीजे आणि लेझर लाईट वापरावर या शहरात बंदी

नाशिक, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच पार पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीच लेझर लाईट्समुळे नाशिकमधील काही तरुणांवर दृष्टी गमावण्याची वेळ आली होती, या प्रकाराती गंभीर दखल घेत आता नवरात्र उत्सवात लेझर लाईट्स आणि डीजेच्या वापरावर बंदी घालण्याचा स्तुत्य निर्णय नाशिक शहर पोलिसांनी घेतला आहे. नाशिकमध्ये डीजे आणि लेझरवर पोलीस आयुक्तालयाने निर्बंध घातले आहेत. तसेच नवरात्रोत्सवात लेझर आणि डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांनी डीजेचा दणदणाट व लेझरचा झगमगाट करत पोलिसांचे आदेशाला पायदळी तुडवले होते. विसर्जन मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादेचेही पालनही झाले नाही. अनेकांनी त्रास झाल्याच्या तक्रारी देखील केल्या होत्या. त्यामुळे आता शहर पोलिसांनी डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजेचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

य आता गरब्याचे आयोजन करणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळांना लेझर उपकरणांचा वापर करता येणार नाही. नवरात्रोत्सवात गरबा व दांडिया आयोजित करणाऱ्या मंडळांना डीजे लावण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच साउंड सिस्टिमचा मर्यादित आवाजात वापर करण्याचे आदेश पोलिसांनी काढले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच यासंदर्भातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह आयोजकांना पोलिसांकडून सूचना करण्यात येत आहे

SL/KA/SL

5 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *