मुख्यमंत्र्यांनी चक्क सहा मिनिटे वाचला जुना अर्थसंकल्प
जयपूर,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या महिन्याच्या सुरुवातीला संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर आता देशातील विविध राज्यांमध्ये राज्य अर्थसंकल्प मांडणीचे वारे वाहू लागले आहेत. यामध्ये आज राजस्थानचा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री यांच्याकडून चुकून एक मजेदार प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज विधानसभेत चक्क जुने अर्थसंकल्पीय भाषण वाचून दाखवले. सुमारे 6 मिनिटे आपण जुने बजेट वाचत आहोत हे त्यांच्या आणि उपस्थितांच्या लक्षातच आले नाही.
गोंधळामुळे कामकाज तहकुब
गेहलोत यांनी दोन मुद्दे जशास तसे वाचले, हे पाहून सरकारचे मुख्य सचेतक महेश जोशी मुख्यमंत्र्यांच्या कानात सागून हे लक्षात आणून दिले. दरम्यान, मुख्यमंत्री जुने भाषण वाचत असून अर्थसंकल्प लीक झाला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते व उपनेते यांनी केला. त्यावरून गदारोळ सुरू झाला. भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन गदारोळ सुरू केल्याने गोंधळ वाढू लागला, त्यानंतर सभापतींनी 11.12 वाजता सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. विरोधी सदस्यांनी सभागृहात येऊन गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांनी जुना अर्थसंकल्प वाचल्याचा आरोपही विरोधकांनी केला. प्रचंड गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव उषा शर्मा यांना बोलावून अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली.
कामकाजातून या घटनेचा उल्लेख वगळला
दरम्यान विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, जे काही घडले ते दुर्दैवी आहे, याची आम्हाला यापूर्वीच माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी जे भाषण दिले ते योग्य असणार नाही. आजच्या घटनेने दु:ख झाले. मानवी चुका होत राहतात. ही संपूर्ण कार्यवाही वगळण्यात येत आहे.
SL/KA/SL
10 Feb. 2023