मुख्यमंत्री पोहोचले जखमी गायकवाडांना भेटायला

 मुख्यमंत्री पोहोचले जखमी गायकवाडांना भेटायला

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली.

झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या सोबत होते.

ML/KA/SL

3 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *