मुख्यमंत्र्यांनी केली अवकाळी नुकसानीची पाहणी

 मुख्यमंत्र्यांनी केली अवकाळी नुकसानीची पाहणी

नागपूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मौदा तालुक्यातील तारसा निमखेडा या गावांना भेटी दिल्या.

नागपूर जिल्ह्यामध्ये या पावसात जवळपास 124 गावांना फटका बसला आहे 852 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. मौदा तालुक्यात रामटेक पारशिवणी तालुक्यातही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात धानासोबतच कापूस, तूर, संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.

ML/KA/SL

7 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *