हिवाळी अधिवेशनाचा घोळ संपला, आज झाला निर्णय
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखेचा घोळ आज अखेर संपुष्टात आला असून आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येऊन सात तारखेपासूनच हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.
मुंबईत संपलेल्या पावसाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशनाची नियोजित तारीख सात डिसेंबर अशी घोषित करण्यात आली होती. राज्यपालांकडून आलेल्या अशा आशयाच्या संदेशाचे वाचन दोन्ही सभागृहात करण्यात आले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणातील सुनावणीत अध्यक्षांनी अकरा तारखेला अधिवेशन सुरू होण्याची शक्यता वर्तविल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
अधिवेशनाला मुंबईतून जाणारे कर्मचारी आणि पत्रकार यांची संख्या अडीच हजाराच्या घरात असते. याशिवाय राज्यभरातून येणारे विविध खाती आणि विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस यांची संख्या धरून ती बारा, तेरा हजारांच्या घरात जाते. यातील बहुतांश लोक आठवडाभर आधीच तिथे दाखल होतात आणि उर्वरित आपली जाण्याची रेल्वे तिकीट आरक्षित करतात. सात की अकरा या तारखेच्या घोळामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते, ते आजच्या निर्णयाने संपुष्टात आले की आहेत.
SL/KA/SL
29 Nov. 2023