राज्यातील कांदा खरेदीस केंद्र सरकार तयार
नागपूर, दि. ११ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना अडचण झाल्यास राज्यातील कांदा हा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे असे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत स्पष्ट केले.
कांदा निर्यातबंदीचा मुद्दा आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडला. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी मोठा आघात असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची भूमिका मांडणार का ? असा सवाल विधान परिषदेचे दानवे यांनी केला.
याशिवाय राज्य सरकारने याबाबत सुस्पष्ट भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांचे 2 हजार 500 रुपयांचे नुकसान सरकार सोसणार का ? असा प्रश्न ही दानवे यांनी यावेळी केला… यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. देशात कांद्याची उपलब्धता ही केवळ 25 ते 30% असून कांदा निर्यात केल्यास देशात कांद्याची टंचाई निर्माण झाल्यास अडचण होऊ शकते त्यामुळे यातून मार्ग काढण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांना अडचण झाल्यास राज्यातील कांदा हा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे असे फडणवीस म्हणाले. या संदर्भात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचाशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
ML/KA/SL
11 Dec. 2023