केंद्र सरकारने केली इथेनॉल खरेदीच्या दरात वाढ

 केंद्र सरकारने केली इथेनॉल खरेदीच्या दरात वाढ

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इथेनॉल खरेदी दरात प्रति लिटर मागे ६.८७ रुपये वाढ झाली आहे. यामुळे इथेनॉलचा खरेदी दर आता ४९.४१ रुपये प्रति लिटर वरून थेट ५६.२८ रु. प्रति लिटर एवढा झाला आहे. . सध्या पेट्रोलमध्ये १०% पर्यंत इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. नरेंद्र मोदी सरकारला २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण २०% पर्यंत न्यायचे आहे. या पार्श्वभूमीवर इथेनॉलचा खरेदी दर वाढवण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

साखर कारखान्यांतून निर्माण होणाऱ्या C मोलॅसिसचा उपयोग करून इथेनॉलची निर्मिती करणे हा हरित अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा महत्त्वाचा मार्ग असल्याचे पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आज म्हटले आहे.

भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा इथेनॉल उत्पादक देश आहे. त्यामुळेच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत सरकार आग्रही आहे. कारण आपल्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के तेलाची आयात करतो. इथेनॉलचे उत्पादन आणि वापर वाढल्यास तेल आयातीवर नियंत्रण ठेवण्यासही मदत होणार आहे.

SL/KA/SL

29 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *