राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI कडून चौकशी सुरू
राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू असून दिल्ली उच्च न्यायालयाला बुधवारी सरकारी यंत्रणांनी माहिती दिली. पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत चौकशी व्हावी याबाबतची याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसंच अलहाबाद उच्च न्यायालयातही भाजप कार्यकर्ता एस विघ्नेश शिशिर यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती. त्यानुसार राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, एकाच प्रकरणाची दोन वेगवेगळ्या न्यायालयात सुनावणी होऊ शकत नाही. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते विघ्नेश शिशिर यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी राहुल गांधी यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे.