EVM वर दिसणार उमेदवाराचे रंगीत छायाचित्र

नवी दिल्ली, दि. १७ : भारताच्या निवडणूक प्रक्रियेत एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक बदल होत आहे. निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे की येत्या विधानसभा निवडणुकांपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (EVM) उमेदवाराचे रंगीत छायाचित्र देखील दिसणार आहे. या निर्णयामुळे मतदारांना मतदान करताना अधिक स्पष्टता मिळेल आणि गोंधळ टाळता येईल.
पूर्वी अनेक वेळा असे घडले होते की एकाच नावाचे किंवा एकसारख्या नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीत उभे राहत होते. यामुळे मतदार गोंधळून चुकीच्या उमेदवाराला मत देत होते. या प्रकारामुळे मूळ उमेदवाराचे मत कमी होत होते आणि निकालावर परिणाम होत होता. या समस्येवर उपाय म्हणून आता उमेदवाराच्या नावासोबत त्याचा रंगीत फोटोही दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय असणार नवीन स्वरूप?
रंगीत छायाचित्र: प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर त्याचा स्पष्ट रंगीत फोटो असेल.
निवडणूक चिन्ह: फोटोसोबत पारंपरिक चिन्हही कायम राहील.
मोठा आणि ठळक फॉन्ट: मतपत्रिकेवरील अक्षरे मोठ्या आणि स्पष्ट फॉन्टमध्ये असतील (फॉन्ट साइज ३०).
उत्तम दर्जाचा कागद: मतपत्रिका 70 GSM गुणवत्तेच्या कागदावर छापली जाईल.
विशिष्ट रंग वापर: विधानसभा निवडणुकीसाठी गुलाबी रंगाचा RGB कागद वापरण्यात येणार आहे
या नव्या प्रणालीमुळे ग्रामीण भागातील आणि वृद्ध मतदारांना मतदान करताना अधिक सोपे आणि स्पष्ट अनुभव मिळेल. उमेदवाराचे चेहरा ओळखता येईल, त्यामुळे गोंधळ कमी होईल आणि मतदारांचा विश्वास वाढेल.
निवडणूक आयोगाने 1961 च्या निवडणूक आचारसंहितेतील नियम 49B मध्ये सुधारणा करून हा बदल अधिकृतपणे लागू केला आहे. गेल्या सहा महिन्यांत आयोगाने एकूण 28 सुधारणा केल्या असून, ही सुधारणा सर्वात महत्त्वाची मानली जात आहे