पंतप्रधान मोदींनी लिहीलेला ग्रंथ आता मराठीत उपलब्ध
मुंबई,दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ संघ प्रचारक कै. लक्ष्मणराव इनामदार उपाख्य वकील साहेब यांच्या कार्याचे हृदयस्पर्शी वर्णन करणारा ‘सेतुबंध’हा ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्व. राजाभाऊ नेने यांनी लिहिला आहे. हा मूळ गुजराती ग्रंथ आता मराठीत उपलब्ध होणार आहे. मंगळवार, ४ जुलै २०२३ रोजी, सायंकाळी ६ वाजता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे या मूळ गुजराती भाषेतील ग्रंथाच्या मराठी अनुवादित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या हस्ते ‘सेतूबंध’ मराठी अनुवाद प्रकाशित करण्यात येईल. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील ज्येष्ठ स्वयंसेवक विमल केडिया हे विशेष अतिथी म्हणून सोहळ्यात सहभागी असणार आहेत. या पुस्तकाची संकल्पना संजय हेमंत इनामदार यांची आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक आनंद लिमये यांनी केले आहे.
SL/KA/SL
30 June 2023