हॉलिवुडमध्ये सुरु आहे ६ दशकांतील सर्वांत मोठा संप

 हॉलिवुडमध्ये सुरु आहे ६ दशकांतील सर्वांत मोठा संप

लॉस ऍजेलिस, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हॉलिवुडमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून लेखकांचा संप सुरू आहे या संपात आता अभिनेते-अभिनेत्री देखील सामील झाले. हॉलिवूडमधला गेल्या 6 दशकांतील हा सर्वात मोठा संप आहे. ख्रिस्तोफर नोलनच्या ओपेनहाइमर चित्रपटातील मेट डेम, एमिली ब्लंट, सिलियन मर्फी आणि फ्लॉरेन्स पगचे कलाकार प्रीमियर सोडून गेले. 1.71 लाखांहून अधिक लेखक आणि अभिनेते लॉस एंजेलिसमधील नेटफ्लिक्स कार्यालयासमोर निदर्शने करत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे काम मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची कमाई कमी झाली आहे.

11 आठवड्यांपासून सुरू असलेल्या लेखकांच्या या संपाला हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये ब्रॅड पिट, मेरील स्ट्रीप, जेनिफर लॉरेन्स, चार्लीझ थेरॉन, जोकिन फिनोक्स, जेमी ली कर्टिस, ऑलिव्हिया वाइल्ड, इवान मॅकग्रेगर यांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जॉर्ज क्लूनी, जोन क्युसॅक आणि मार्क रफालो यांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. या संपामुळे अवतार आणि ग्लॅडिएटर सारख्या मोठ्या चित्रपट मालिकांच्या सिक्वेलला धोका निर्माण झाला आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हॉलीवूडमध्ये नवनवीन कल्पना, कथा, संवाद आणि पटकथा लेखन केले जात आहे. त्यामुळे लेखकांना काम मिळत नाही. राइटर्स युनियनचे प्रमुख फ्रॅन ड्रेसर म्हणाले की, कलाकार रोजच्या बरखास्तीने कंटाळले आहेत. आता काम मिळणे कमी झाले आहे. AI मुळे कंपन्यांनी लेखकांना गिग वर्कर बनवले आहे. पार्श्वभूमीतील कलाकारांचे एकदा स्कॅनिंग करून एक दिवसाचे वेतन मिळावे, असा प्रस्ताव अनेक प्रॉडक्शन हाऊसने मांडला आहे. यानंतर कंपन्या त्यांचे स्कॅन एआयच्या माध्यमातून त्यांना हव्या त्या प्रोजेक्टमध्ये वापरू शकतील. यासाठी कलाकारांच्या संमतीची वारंवार गरज भासणार नाही किंवा प्रत्येक वेळी कोणतीही भरपाई दिली जाणार नाही.

ML/KA/SL

15 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *