मुंबईत सुरु झाला देशातील सर्वांत मोठा लक्झरी मॉल
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हा देशातील सर्वात मोठा लक्झरी मॉल’जिओ वर्ल्ड प्लाझा’ आज मुंबईत सुरू झाला. हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा मॉल वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये असून हा मॉल 7.50 लाख स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरपर्सन मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी, भावी सून राधिका मर्चंट आणि मुलगी ईशा अंबानी यांच्यासोबत मॉलच्या लॉन्चिंगसाठी आयोजित रेड कार्पेट इव्हेंटमध्ये पोज देताना दिसले. याशिवाय बॉलिवूडचे अनेक स्टार्सही या कार्यक्रमात उपस्थित होते.
या मॉलमध्ये Balenciaga, Cartier, Louis Vito, Versace, Valentino, Manish Malhotra, Abu Jani, Sandeep Khosla, Pottery Barn, Gucci आणि EL&N Café यासह जगातील अनेक महागडे आणि प्रमुख ब्रँड्स उपलब्ध आहेत. उद्घाटन प्रसंगी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या, ‘जिओ वर्ल्ड प्लाझा उघडण्याचा आमचा उद्देश जगातील सर्वोत्तम ब्रँड भारतात आणणे आहे. याशिवाय, भारतातील कारागिरीच्या ब्रँड्सना ठळकपणे हाइलाइट करण्याचा उद्देश आहे.
यावेळी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, ‘जिओ वर्ल्ड प्लाझा हा केवळ भारतातील सर्वोत्कृष्ट मॉल ठरणार नाही, तर मला आशा आहे की तो जगातील सर्वोत्तम मॉल बनेल. नक्कीच आम्ही त्याची वाट पाहत आहोत. आजचा दिवस सर्व भारतीय डिझायनर्स आणि आपल्या कला आणि कारागिरांसाठीही सन्मानाचा आहे.
जिओ वर्ल्ड प्लाझा अमेरिकन आर्किटेक्चर आणि डिझाईन फर्म TVS आणि रिलायन्स टीम यांनी संयुक्तपणे डिझाइन केले आहे. संगमरवरी मजले, उंच व्हॉल्टेड छत आणि नेत्रदीपक प्रकाशयोजना या मॉलला आकर्षक बनवते. मॉलमध्ये शॉपिंगपासून ते मल्टिप्लेक्स थिएटर्स आणि उत्तम रेस्टॉरंट्सपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. प्लाझाची रचना कमळाचे फूल आणि निसर्गातील इतर घटकांपासून प्रेरित आहे.
Jio World Plaza मधील मोठ्या ब्रँडमध्ये घड्याळ निर्माता IWC Schaffhausen आणि लक्झरी लगेज मेकर Rimowa यांचा समावेश आहे. हे त्यांचे भारतातील पहिले आउटलेट आहे. अंदाजे 7,500 चौरस फुटांवर, लुई व्हिटॉनचे स्टोअर भारतातील त्याच्या चार आउटलेटपैकी सर्वात मोठे आहे. हे स्टोअर देशातील कार्टियरसाठी दुसरे आणि डायरसाठी तिसरे आहे.
SL/KA/SL
1 Nov. 2023