अर्थसंकल्पात रेल्वेसाठी झाली आजवरची सर्वात मोठी तरतूद

 अर्थसंकल्पात रेल्वेसाठी झाली आजवरची सर्वात मोठी तरतूद

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा सर्वाधिक भार वाहणाऱ्या भारतीय रेल्वेच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.  रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून ही आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे.

रेल्वेमध्ये १०० नवीन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय नवीन योजनांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. खासगी क्षेत्राच्या मदतीने १०० योजना शोधण्यात आल्या आहेत. ज्यावर यापुढील काम केले जातील, असेही अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.

प्रवाशांच्या वाढलेल्या अपेक्षांसह, रेल्वे राजधानी, शताब्दी, दुरांतो, हमसफर आणि तेजस सारख्या प्रीमियर ट्रेनच्या 1  हजार हून अधिक डब्यांचे नूतनीकरण करण्याची योजना आहे. तर या डब्यांचे आतील भाग आधुनिक रूपात सुधारले जातील आणि प्रवाशांच्या सोयी वाढतील.

अर्थसंकल्पात, सरकारने 35 हायड्रोजन इंधनावर आधारित गाड्या, साइड एंट्रीसह 4,500 नवीन डिझाइन केलेले ऑटोमोबाईल वाहक कोच, 5,000 LHB कोच आणि 58,000 वॅगन तयार करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

वंदे भारत एक्सप्रेस अधिक स्थानांवरून सुरू करणार

रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी जुने ट्रॅक बदलण्याबरोबरच वंदे भारत एक्सप्रेस अधिक स्थानांवरून सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने रेल्वे आणखी 100 विस्टाडोम कोच तयार करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.

अर्थसंकल्पात, सरकारने 35 हायड्रोजन इंधनावर आधारित गाड्या, साइड एंट्रीसह 4,500 नवीन डिझाइन केलेले ऑटोमोबाईल वाहक कोच, 5,000 LHB कोच आणि 58,000 वॅगन तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला एकूण १४०३६७.१३ कोटी रुपये दिले होते. गेल्या अर्थसंकल्पातही सरकारने रेल्वेच्या बजेटमध्ये वाढ केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर रेल्वे बजेटमध्ये २० हजार कोटींहून अधिक वाढ झाली आहे.

SL/KA/SL

2 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *