सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर घातलेली बंदी सशर्त उठविली

 सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर घातलेली बंदी सशर्त उठविली

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सरकारने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर घातलेली बंदी उठविली आहे. प्लास्टिकच्या ६० जीएसएमपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या, पेपर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, चमचे, काटे यांच्या वापरण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मार्च २०१८ पासून या वस्तूंच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. बंदी शिथिल करण्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारकडून गुरुवारी जारी करण्यात आली आहे.The banned ban on the use of single users plastic lifted conditional

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने २३ मार्च २०१८ रोजी सिंगल यूज प्लास्टिकसह प्लास्टिक पॅकिंगवरही बंदी घातली हाेती. त्यानंतर ही अट शिथिलही करण्यात आली होती. रामदास कदम पर्यावरणमंत्री असताना बंदी राज्यभर लागू करण्यात आली. प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्या. केंद्र सरकारनेही १ जुलै रोजी सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आदेश जारी केला.

ML/KA/PGB
6 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *