बँक ऑफ जपान ने १७ वर्षांनंतर वाढवले व्याजदर

टोकीयो, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
जागतीक महासत्ता होणाच्या शर्यतीत सातत्याने धावणाऱ्या जपानच्या प्रगतीला गेल्या काही महिन्यांपासून काहीशी खिळ बसली आहे. जपानला आर्थिक आघाडीवर काही काळापासून मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
जपानने आर्थिकदृष्ट्या ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बँक ऑफ जपान या जपानच्या मध्यवर्ती बँकेने 17 वर्षांनंतर आपले प्रमुख व्याजदर वाढवले आहेत. आता जपानचा अल्पकालीन व्याजदर 0.1 टक्के झाला आहे, जो पूर्वी मायनस 0.1 टक्के होता.
बँक ऑफ जपानने फेब्रुवारी 2007 मध्ये अखेरचे व्याजदर वाढवले होते. तेव्हापासून त्यात सातत्याने घट होत आहे. आठ वर्षांपूर्वी ते मायनसवर पोहोचले आणि अजूनही मायनसच होते. बँक ऑफ जपान ही जगातील एकमेव मध्यवर्ती बँक होती जिचा मुख्य व्याज दर मायनस होता. पण, आता व्याजदर वाढला आहे.
जपानमधील मायनस व्याजदरामुळे तेथील गुंतवणूकदार त्या देशांमध्ये पैसे गुंतवायचे जिथे त्यांना चांगला परतावा मिळत असे. यामध्ये भारताचाही समावेश होता. आता जपानमध्ये व्याजदर वाढल्याने जपानी गुंतवणूकदार त्यांच्या देशात गुंतवणूक वाढवू शकतात. अशा परिस्थितीत, भारतासारख्या देशांसाठी परिस्थिती थोडी कठीण होऊ शकते. कारण जपानी गुंतवणूकदारांकडून स्वस्त दरात कर्ज मिळत होते. मात्र, जपानमधील व्याजदरातील वाढ अजूनही खूपच माफक आहे आणि इतर अनेक देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
जपान या वर्षी ते आर्थिक मंदीच्या भीषणतेखाली आले आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरले. या यादीत 4.2 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपी आकाराच्या जपानला 4.5 ट्रिलियन डॉलर्स जीडीपी असलेल्या जर्मनीने मागे टाकले. जपानचा जीडीपी गेल्या दोन तिमाहीत घसरला. जपानी चलन येनचे मूल्यही अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमी झाले. या सर्व प्रकारामुळे जपानने आपल्या आर्थिक धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
SL/ML/SL
20 March 2024