विरोधकांची रश्मी तर सत्ताधाऱ्यांची दिशा, विधानसभा पाच वेळा तहकूब
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिशा सलियान प्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, त्याआधी विरोधकांनी रश्मी शुक्ला यांच्या क्लोजर रिपोर्टचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्यावर सत्तारूढ सदस्यांनी सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापक दिशा सलियन मृत्यू प्रकरण उपस्थित केल्यावर सभागृहात गदारोळ झाला आणि कामकाज पाच वेळा तहकूब करावं लागलं.the Assembly was adjourned five times
नाना पटोले यांनी नियम ५७ ची नोटीस देत सर्व कामकाज बाजूला ठेऊन रश्मी शुक्ला प्रकरणी चर्चेची मागणी केली होती, अधक्षानी ती नाकारल्यावर विरोधक आक्रमक झाले, गदारोळ झाला त्या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास झाला.
तास संपल्यावर विरोधक सभागृहात परतले , दिवंगत सदस्य जनार्दन अहेर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यानंतर आधी भरत गोगावले आणि नंतर नितेश राणे यांनी दिशा सलियान हीचा मुद्दा उपस्थित केला. दिशाच्या मृत्यू प्रकरणी कोणाला पाठीशी घातलं जातं आहे असा सवाल त्यांनी केला. सत्तारूढ बाजू आक्रमक झाली , ते जागा सोडून पुढे आले आणि गदारोळ होत राहिला .
त्याआधी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील आरोप प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सरकारने का दिला , इतकी घाई का होती असा सवाल करीत नाना पटोले यांनी नियम ५७ अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेऊन यावर चर्चा घेण्याची मागणी केली, ती अध्यक्षांनी फेटाळली त्यामुळे गदारोळ होऊन विरोधकांनी सभात्याग केला.
रश्मी शुक्ला यांनी अनेक विरोधी नेत्यांचे फोन टॅपिंग केलं आणि व्यक्तीसस्वातंत्र्यावर घाला घातला असा पटोले यांचा आरोप होता , अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी त्यांना दोन मिनिटे बोलू दिले मात्र चर्चा नाकारली याने विरोधक आक्रमक झाले, जागा सोडून पुढे गेले, घोषणाबाजी सुरू झाली, या गोंधळात अध्यक्षांनी प्रश्नोत्तरे पुकारली त्यावर चर्चा झाली.
दरम्यान अध्यक्षांनी अजित पवार यांना बोलण्यास परवानगी दिली, आम्हाला चर्चा नाकारून अध्यक्ष सत्ताधाऱ्यांची बाजू घेतात असा आमचा समज झाला आहे, सरकार अशा पोलीस अधिकाऱ्याला का पाठीशी घालते असे सांगत अजित पवार यांनी सभात्याग करण्याची घोषणा केली, विरोधक निघून गेल्यावर सभागृहात प्रश्नोत्तरे सुरू होती.
ML/KA/PGB
22 Dec .2022