रब्बी हंगामात करडईच्या क्षेत्रात झाली दुप्पटीने वाढ

वाशिम, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात करडईच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३९१ हेक्टरवर करडईची पेरणी अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात ही पेरणी तब्बल ७५८ हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या तुलनेत करडईच्या क्षेत्रात दुप्पट वाढ झाली आहे.
जिल्ह्यातून करडईचं पीक जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होतं. २० वर्षांपूर्वी करडईचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होतं. मात्र, या पिकाला योग्य बाजारपेठ न मिळाल्याने आणि अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी करडईकडे पाठ फिरवली होती.
मात्र, मागील तीन-चार वर्षांपासून परिस्थितीत बदल होताना दिसत आहे. करडईला चांगला भाव मिळत असल्याने आणि मागणी वाढल्याने शेतकरी पुन्हा जुन्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. यंदा जिल्ह्यात करडईची पेरणी ७५८ हेक्टरवर झाली आहे.
ML/ML/SL
20 Jan. 2025