महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी या खेळाडूची नियुक्ती
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : BCCI ने अमोल मुझुमदार यांच्या हाती भारतीय महिला वरिष्ठ संघाचे प्रशिक्षपद सुपूर्द केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या संघाचे प्रशिक्षकपद रिकामे होते. महिलांचा संघ हा चांगली कामगिरी करत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला संघात काही वाद पाहायला मिळाले होते. त्यामुळे बीसीसीआयने अमोल यांच्यासारख्या शांत प्रशिक्षकांच्या हातात संघाची धुरा सोपवली असल्याचे म्हटले जात आहे.
अमोल यांनी आतापर्यंत खेळाडू आणि समालोचक म्हणून चांगले नाव कमावले आहे. अमोल यांनी यापूर्वी प्रशिक्षकाचीही भूमिका पार पाडली आहे. पण त्यांच्यासाठी ही संधी नक्कीच मोठी असेल. भारतीय क्रिकेटमध्ये अमोल मुझुमदार हे एक शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ओळखले जातात. अमोल यांनी एक काळ चांगलाच गाजवला होता आणि सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावरही केला होता. अमोल यांनी यापूर्वी प्रशिक्षकाची जबाबदारी बऱ्याचदा सोपवली आहे आणि त्यांनी चांगले निकालही संघाला दिले आहेत. त्यामुळे अमोल यांची निवड आता महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी केली असल्याचे म्हटले जात आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये महिलांसाठी आयसीसी मोठ्या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. त्यामुळेच अमोल यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
SL/KA/SL
25 Oct. 2023