नार्वेकरांची नेमणूक , हे लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल

 नार्वेकरांची नेमणूक , हे लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच, परंतू त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल असे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा यापुढे देशात असेल असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॅाक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल. अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. The appointment of Norwegians is the next step towards the end of democracy

ML/KA/PGB
29 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *