कर्नाटकच्या १८ वर्षीय फलंदाजाने उभारला ४०४ धावांचा डोंगर

 कर्नाटकच्या १८ वर्षीय फलंदाजाने उभारला ४०४ धावांचा डोंगर

शिवमोग्गा, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने मुंबईविरुद्ध कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 404 धावांची नाबाद खेळी खेळली. यासह तो या स्पर्धेत 400+ धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.प्रखरच्या खेळीमुळे सामना अनिर्णित राहिला आणि आघाडीच्या जोरावर कर्नाटकने ट्रॉफी जिंकली. कूचबिहार ट्रॉफी ही भारताची अंडर-19 खेळाडूंसाठीची फर्स्ट क्लास डोमेस्टिक टूर्नामेंट आहे.

प्रखरने कर्नाटकसाठी डावाची सुरुवात केली आणि डाव घोषित होईपर्यंत तो नाबाद राहिला. त्याने या डावात 638 चेंडूंचा सामना केला आणि 46 चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्या खेळीच्या जोरावर, कर्नाटकने पहिला डाव घोषित करण्यापूर्वी 223 षटकात 8 विकेट गमावून 890 धावांची मोठी धावसंख्या उभारली.या सामन्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडनेही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 46 चेंडूत 22 धावा केल्या. समितने गोलंदाजी करताना दोन बळीही घेतले.

संघातील हर्षिल धर्मानी हा डावाचा दुसरा शतकवीर होता, त्याने 228 चेंडूत 19 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 169 धावा केल्या. प्रखरने त्याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 290 धावांची भागीदारी केली.स्पर्धेचा अंतिम सामना शिवमोग्गा येथील केएससीए नेव्हेल स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर, सलामीवीर आयुष म्हात्रेच्या 145 धावांच्या जोरावर मुंबईला पहिल्या डावात 380 धावा मिळाल्याने कर्नाटक बॅकफूटवर होता.

मात्र, प्रखर चतुर्वेदी मैदानात उतरल्यावर कर्नाटक अधिक मजबूत स्थितीत आला. त्याने 404 धावा करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकने पहिल्या डावात 510 धावांची मोठी आघाडी घेतली आणि चौथ्या दिवशी डाव घोषित केल्यानंतर लगेचच दोन्ही संघांनी अनिर्णित राहण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात आघाडी घेत कर्नाटक यंदाच्या मोसमात कूचबिहार ट्रॉफीचा चॅम्पियन ठरला.

SL/KA/SL

15 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *