पावसामुळे उद्या होणाऱ्या 10वी व 12वीच्या पुरवणी परीक्षा ढकलल्या पुढे

 पावसामुळे उद्या होणाऱ्या 10वी व 12वीच्या पुरवणी परीक्षा ढकलल्या पुढे

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरु असल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांनी सुट्टी देण्यात आली आहे. IMD ने अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या १० वी आणि १२ वी च्या पुरवणी परीक्षाही आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (25 जुलै) होणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 26 जुलै रोजी होणारा दहावी बोर्डाचा पुरवणी परीक्षेचा पेपर 31 जुलै रोजी होणार आहे. तर बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचा उद्याचा पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

26 जुलै रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 चा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान नियोजित होता. मात्र आता हा पेपर 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान होईल. तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा वाणिज्य आणि संघटन व्यवस्थापन , अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, एमसीव्हीसी पेपर-2 हे तीन पेपर होते. हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीन पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्याही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि वाहतूक सेवावर त्याचा परिणाम झाला आहे. म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आज या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

SL/ML/SL

25 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *