ठाण्यात उभे राहत आहे सहाशे खाटांचे कॅन्सर रुग्णालय
ठाणे , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या साहाय्याने ठाण्यात जितो इंटरनॅशनल , ठाणे महानगर पालिका यांनी संयुक्तपणे नियोजित केलेल्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर यांचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते आज करण्यात आलं.सध्या रोटी , कपडा आणि मकान यापेक्षा अधिक गरज शिक्षण आणि आरोग्य सुविधांची गरज आहे असं मत डॉ भागवत यांनी व्यक्त केलं, देशात या दोन्ही सुविधांची कमतरता आहे , सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीने , त्यांच्या घराजवळ या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे असं ही ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस , दिपकभाई देसाई , केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पूर्वी कोविड सेंटर असणाऱ्या जागेत आता सहाशे खाटांचे सुसज्ज कॅन्सर रुग्णालय उभे राहणार आहे.सध्याच्या जीवनशैलीने असाध्य रोगांच्या संख्येत वाढ होत आहे, म्हणूनच त्यासाठी संवेदनशील मनाने असे जीव कार्य करणाऱ्या अर्थात ईश्वर कार्य करणाऱ्या लोकांची गरज आहे, हे रुग्णालय उभारून असेच कार्य होणं अपेक्षित आहे असं डॉ भागवत म्हणाले. राज्य सरकार सर्वतोपरी या कामाला सहकार्य करेल, आनंद दिघे यांचं कार्य सर्वसामान्य लोकांना समर्पित होतं, त्यामुळे हे त्यांचं जिवंत स्मारक बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलाव्यक्त केला.
ML/KA/PGB 30 July 2023