ठाणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर उंदीर आणि घुशींचा उच्छाद

ठाणे, दि ४– मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकांवरील साफसफाई आणि व्यवस्थापनावर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अलीकडेच प्रवाशांनी प्लॅटफॉर्म 5 व 6 वर उंदीर आणि घुशी मुक्तपणे सुसळसुळत फिरताना पाहिल्या. या प्रकारामुळे केवळ घाण नाही तर प्रवाशांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
खाण्याचे पदार्थ खुल्या ठिकाणी टाकले जात असल्याने उंदरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना विशेष धोका निर्माण होतो आहे.
“हा स्टेशन आहे की उंदरांचा अड्डा?” – असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. अनेकांनी या संदर्भात फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे.
रेल्वे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा यामुळे गंभीर अपघात आणि आजार उद्भवू शकतात. KK/ML/MS