ठाणे रोडवरील काँक्रिटीकरणाच्या कामात ठेकेदाराकडून चाललेली दिरंगाई —

ठाणे, दि १
भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ठाणे रोडवर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामात ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. नागरिकांच्या या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार श्री. महेश चौघुले यांनी स्वतः ठाणा रोड येथे भेट देत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अनमोल सागर यांच्यासोबत साईट व्हिजिट केली.
परीक्षणादरम्यान आमदार चौघुले यांनी संबंधित ठेकेदाराला कडक शब्दांत सुनावले व येणाऱ्या गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या दोन्ही महत्वपूर्ण सणांपूर्वी संपूर्ण काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
ते म्हणाले, “सणाच्या काळात नागरिकांना वाहतुकीस अडथळा होणे अथवा अन्य प्रकारची गैरसोय होणे, हे मुळीच सहन केले जाणार नाही. कामात होणारी दिरंगाई आणि हलगर्जीपणा याविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल.”
या दौऱ्यात अनेक स्थानिक रहिवाशांनी आमदारांना थेट त्यांच्या अडचणी सांगितल्या. त्या सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून त्यांनी महापालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना व कामावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले. AG/ML/MS