ठाणे क्राईम ब्रँचचा मोठा पर्दाफाश; शस्त्रसाठा व बनावट नोटांसह सराईत आरोपी अटकेत

 ठाणे क्राईम ब्रँचचा मोठा पर्दाफाश; शस्त्रसाठा व बनावट नोटांसह सराईत आरोपी अटकेत

ठाणे प्रतिनिधी : ठाणे शहर पोलीस यांच्या गुन्हे शाखा, युनिट-३, कल्याणने डोंबिवली परिसरात कारवाई करत सराईत गुन्हेगार सुरेंद्र पांडुरंग पाटील (४५) याला अटक केली आहे.
प्रेस वार्तेत क्राईम टीसीपी अंबर से जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून ३ पिस्तूल, २ रिव्हॉल्व्हर, ७ गावठी कट्टे, तलवारी-कोयते-चाकूंसह धारदार शस्त्रे, ४०४ जिवंत काडतुसे, १६७ छरे, २ मोबाईल आणि ₹३,५२,००० किमतीच्या बनावट नोटा असा मोठा साठा जप्त करण्यात आला. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ₹१२.२१ लाख आहे.
ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून करण्यात आली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *