वाढत्या थंडीचा गहू पिकाला फायदा…
जालना दि १६ : जालना जिल्ह्यात वाढत्या थंडीचा गहू पिकाला मोठा फायदा होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग आला असून आतापर्यंत सरासरी 35 हजार 702 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. गहू पिकाच्या चांगल्या वाढीसाठी थंड वातावरण पोषक ठरत आहे. सध्या जालना जिल्ह्यात थंडीचा पारा चांगलाच घसरल्याने गहू पिकाच्या वाढीस अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा गव्हाचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.ML/ML/MS