वाघोबांचे थंडा थंडा कुल कुल
यवतमाळ दि २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सिअस च्या समोर गेले आहे. त्यामुळे मनुष्यच नव्हे तर जंगलातील प्राण्यांनाही याचा त्रास होत आहे. या कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघ सुद्धा पाण्यात डुबकी लावत आहे.
यानिमित्त येथे वाघोबांचं सहज दर्शन घडत आहे. नेमका हा क्षण टिपण्यासाठी रखरखत्या उन्हात मोठ्या संख्येने पर्यटक टिपेश्वर अभयारण्यात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठयावर थंडा थंडा कुल कुल असे मनात म्हणत वाघोबा पाण्यात मनसोक्त डुबकी घेत आहेत.
ML/KA/SL
22 May 2023