थालेसिमिया रोखण्यासाठी विवाहपूर्व चाचणी अत्यावश्यक

मुंबई दि ३ — राज्यात विवाहपूर्व थालेसीमिया रोगाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. याबाबतचा प्रश्न विकास ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

राज्यात बारा हजार आठशे इतके थालेसीमिया रुग्ण असून हा गंभीर आजार आहे, त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या संततीत तो येऊन त्याचे गांभीर्य वाढेल हे लक्षात घेऊन एक पाऊल थालेसीमिया मुक्तीच्या दिशेने हे अभियान राबविण्यात येत आहे. परभणीत यासाठी एक पायलट प्रकल्प राबविण्यात आला आहे, तो राज्यभर लागू करण्यात येत आहे असं बोर्डीकर म्हणाल्या. प्रत्येक जिल्ह्यात या रोगाची उपचार केंद्र सुरू करण्यात येतील अशी माहिती ही त्यांनी दिली.
याबाबतचे उपप्रश्न राहुल पाटील, अमित देशमुख, महेश शिंदे, रणधीर सावरकर आदींनी विचारले. ML/ML/MS