ठाकरे गटाला मोठा दणका

 ठाकरे गटाला मोठा दणका

मुंबई , दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या प्रभागाच्या संख्येवरून निर्माण झालेल्या वादाबाबत 18 जानेवारी रोजी सुनावणी पूर्ण करून राखून ठेवलेला निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी जाहीर केला. उच्च न्यायालयानं निकाल देताना ठाकरे गटाला मोठा दणका देत मुंबई महापालिकेतील प्रभागरचना 236 वरून 227 वर कायम राहणार असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबई महापालिकेची वार्ड संख्या 227 वार्ड वरुन 236 करण्यात आली होती.या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटाचेमाजी नगरसेवक राजू पेडणेकर व समीर देसाई यांच्या याचिकावर न्यायमूर्ती सुनील सुक्रे व न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांच्या खंडपीठाने तीन महिन्यापूर्वी तीन दिवस अंतिम सुनामी घेतल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता .न्यायालयाने राजू पेडणेकर यांची याचिका फेटाळून लावत ठाकरे गटाला मोठा दणका दिला . मुंबई महापालिकेतील प्रभागरचना 236 वरून 227 वर कायम राहणार असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्या वाढीच्या अनुषंगाने मुंबईतील एकूण प्रभागाचे संख्या 227 वरून 236 करण्याचा निर्णय घेत तशी कायदादुरुस्ती केली होती. मात्र शिंदे सरकारने आधी वटहुकूम आणून आणि नंतर कायद्यात फेरदुरुस्ती करून ती संख्या पुन्हा 227 केली .त्यामुळे पालिका निवडणूक लांबणीवर पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाचे पालन करत 236 प्रभागाप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने पावले उचलून प्रक्रिया अंतिम केली होती. मात्र शिंदे सरकारने नंतर अध्यादेश व कायदा आणून ती संख्या पुन्हा 227 करून या आदेशाचे उल्ल ंघन केले, असा मुख्य युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी मांडला . तर आम्ही प्रभागाची संख्या पुन्हा 227 करण्याचा 4 मे 2022 रोजी घेतलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने घेतला आहे, असा दावा शिंदे सरकार तर्फे मांडण्यात आला होता.

ML/KA/PGB 17 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *