ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

 ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव


मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत दाखल असलेल्या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे. त्यांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला होता. शिवसेनातील या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांच्या नेतृत्वातील या गटाने भाजपच्या पाठिंब्याने राज्यात युती सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. या सगळ्यात आता उद्धव ठाकरे गट पुन्हा सक्रीय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निलंबनाबाबत ठाकरे गटाने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह इतर शिवसेना आमदारांच्या निलंबनाबाबत यापूर्वीच कोर्टात मोठ्या प्रमाणात याचिका दाखल आहेत. या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी आता प्रभू यांनी कोर्टात केली आहे.
यासोबतच, विधानसभा अध्यक्षांना या निलंबनाबाबत निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. सुनील प्रभू यांच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ML/KA/PGB
4 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *