Tesla ची रोबोटॅक्सी सेवा सुरू

 Tesla ची रोबोटॅक्सी सेवा सुरू

ऑस्टीन, दि. २३ : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्ला इंकने त्यांची ड्रायव्हरलेस रोबोटॅक्सी सेवा सुरू केली आहे. ऑस्टिन, टेक्सास – एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनीने अखेर त्यांच्या बहुप्रतिक्षित रोबोटॅक्सी सेवा सुरू केली आहे कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली.

मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘रोबोटॅक्सी लाँचच्या यशाबद्दल टेस्ला एआयच्या सॉफ्टवेअर आणि चिप डिझाइन टीमचे अभिनंदन. हे १० वर्षांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. टेस्लाच्या टीमने कोणत्याही बाह्य मदतीशिवाय स्वतःहून एआय चिप आणि सॉफ्टवेअर तयार केले आहे.’

ही सेवा सध्या ऑस्टिन शहरातील निवडक भागांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली असून, Model Y SUV गाड्यांचा वापर करण्यात येत आहे. या गाड्या पूर्णपणे ड्रायव्हरशिवाय चालतात, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने एका टेस्ला कर्मचाऱ्याला प्रवासादरम्यान समोरच्या सीटवर ठेवण्यात येते. सेवा सध्या फक्त आमंत्रित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि एका प्रवासासाठी $4.20 (सुमारे ₹350) इतका निश्चित दर आकारला जातो. एलॉन मस्क यांनी या यशस्वी लाँचबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “टेस्ला AI आणि चिप डिझाईन टीमचे अभिनंदन! दशकभराच्या मेहनतीचे हे फलित आहे.”

ही सेवा दररोज सकाळी ६ ते मध्यरात्री १२ या वेळेत चालू असते, मात्र खराब हवामान, विमानतळ परिसर आणि महामार्गांपासून दूर ठेवण्यात आली आहे. भविष्यात ही सेवा अधिक शहरांमध्ये आणि सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा टेस्लाचा मानस आहे. ही सुरुवात केवळ एक पाऊल असली, तरी स्वयंचलित वाहतुकीच्या भविष्यातील दारं उघडणारी ठरू शकते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *