टेस्लाच्या ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी लागले १.९० लाख लीटर पाणी
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ट्रकला कॅलिफोर्नियामध्ये आग लागली होती. एका वळणावर ट्रक चालकाने नियंत्रण गमावले आणि तो रस्त्यावरून खाली उतरला व झाडावर जाऊन आदळला. यानंतर खाली जात अनेक झाडांना त्याने धडक दिली. आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात चालक सुखरूप असून त्याला जास्त दुखापत झालेली नाही.
या अपघातानंतर लगेचच ट्रकने आग पकडली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या टँकरसोबत विमानाचीही मदत घेण्यात आली. विमानातून या आगीवर आगनियंत्रक पदार्थ टाकण्यात आले. ही आग विझविण्यासाठी तब्बल १.९ लाख लीटर पाणी लागले.
याहून धक्कादायक बाब म्हणजे अपघात झालेला हायवे १५ तास बंद ठेवण्यात आला होता. आग लागल्याने ट्रकमधील बॅटरींचे तापमान ५४० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. आग विझविल्यानंतर तो ट्रक ओढून दुसऱ्या जागी नेण्यात आला. पुन्हा आग लागू नये म्हणून पुन्हा निरीक्षणात देखील ठेवण्यात आला होता.
ML/ML/PGB 20 Nov 2024