देशातील पहिली टेस्ला कार प्रताप सरनाईक यांनी केली खरेदी ….

मुंबई दि ५ — भारतात 15 जुलै रौजी दिमाखात टेस्ला कार (Tesla Car) दाखल झाली. 15 जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे टेस्लाचं शोरुम लॉन्च करण्यात आले होते, यानंतर आजपासून (5 सप्टेंबर) टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. देशातील टेस्लाची पहिली कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी खरेदी केली.
देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार, असा निर्धार प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आज प्रताप सरनाईकांनी टेस्लाची कार खरेदी केली. भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली, याचा मला अभिमान आहे. महत्वाचे म्हणजे ही टेस्ला कार कोणतेही डिस्काऊंट न देता पूर्ण पैसे भरून मी विकत घेतली आहे, अशी माहिती सरनाईकांनी दिली. तसेच टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे, कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश देईल, असं सरनाईक म्हणाले. दरम्यान, जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून टेस्ला ओळखली जाते.ML/ML/MS