भीषण विमान अपघात, ५ भारतीयांसह ६८ प्रवासी मृत्यूमुखी

 भीषण विमान अपघात, ५ भारतीयांसह ६८ प्रवासी मृत्यूमुखी

काठमांडू, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  नेपाळमध्ये आज सकाळी यती एअरलाईन्सच्या ATR-72 या विमानाला भीषण अपघात झाला आहे. नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ प्रवाशांना घेउन जाणारे हे विमान अपघातग्रस्त झाला. या अपघातात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५३ नेपाळी, ५ भारतीय, ४ रशियन,२ कोरीयन आणि प्रत्येकी एक आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांतील प्रत्येकी एका प्रवाशाचा समावेश आहे.

सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीच्या मते, लँडिंगपूर्वी 10 सेकंद अगोदर या विमानात आगीचे लोट दिसून आले. त्यामुळे हा अपघात खराब हवामानामुळे घडल्याचे म्हणता येत नाही.

या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना बचाव कार्यात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

SL/KA/SL

15 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *