माणगावमध्ये भीषण ढगफुटी ! धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह

 माणगावमध्ये भीषण ढगफुटी ! धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह

अलिबाग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याला सध्या सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः झोडपले आहे त्यामुळे काल माणगाव मध्ये चार तास वीज पुरवठा बंद होता. तर निजामपूर भागात तब्बल सहा तासांनी वीज पुरवठा सुरू झाला.

निजामपूरपासून बारा किमी अंतरावर असणार्‍या जोर गावात आणि डोंगर भागातील परिसरात अचानक दुपारी दोन वाजेपासून पाऊस सुरू झाला आणि हा हा म्हणता डोंगर भागातून अचानक पाण्याचा लोंढा आल्याने नागरिक भयभीत झाले होते. जोर गावा जवळ वाहणारी नदी दुथडी भरून वाहू लागली. या अतिवृष्टीमुळे जोर गावाच्या परिसराला ढगफुटी सुदृश्य परिस्थितीचे स्वरूप झाले होते. या गावातील नदीला महापूर आला तसेच शेतामध्ये पाणी घुसले त्यामुळे अनेक शेतीचे नुकसान झाले आहे.

डोंगर भागातून आलेले या पुराच्या लोंढ्यामुळे वाहने ही वाहून गेली आहेत. तब्बल तीन तास पडलेल्या या पावसामुळे शेती तसेच काही वाहनांचे नुकसान केले आहे. त्यानंतर नदीला उथळ भाग असल्याने पूर आता हळूहळू ओसरू लागला आहे.

या गावात यापूर्वी कधीही एवढा पाऊस पडला नाही. एवढा भयानक पाऊस अचानक पडला त्यामुळे ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही वाहनांचे पुरामध्ये नुकसान झाले तर अनेकांची शेतीत पुराचे पाणी घुसल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ML/ML/SL

25 Sept. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *