तेरेखोल नदीने ओलांडली इशारा पातळी, सतर्कतेचे आवाहन

 तेरेखोल नदीने ओलांडली इशारा पातळी, सतर्कतेचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे.तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडलेली असून सदर नदीच्या संपर्कात येत असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कोणीही पाणी असलेल्या रस्त्यांवरून , पुलावरून वाहतूक करू नये, तसेच नदीचे, पुराचे पाण्यात जावू नये अशी सूचना देण्यात आली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे येथील पुलावर पाणी आल्यामुळे येथील वाहतूक रोखण्यात आली आहे . या ऐवजी सावंतवाडी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तिलारी या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आंतरराज्य धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे . याशिवाय 2 मध्यम प्रकल्प आणि 18 लघु पाटबंधारे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 100.5 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. सर्वात जास्त पाऊस वैभववाडी तालुक्यात 124.6 मिलिमीटर झाला आहे.

ML/ML/SL

18 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *