येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले

 येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले

परभणी, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे आज दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. खडकपूर्णा धरणातून विसर्ग सुरू झाल्याने येलदरी धरणाचे 6 गेट क्र.2,3,4,7,8 आणि 9 हे 0.5 मी. ने उघडण्यात आलेत . सध्यस्थितीत वीजनिर्मिती केंद्रातून तिन टरबाईन ने 2600 आणि Spillway गेट क्र.1,5,6 & 10 व्दारे 8440 Cusecs विसर्ग चालू आहे.

Spillway 10 गेट क्र.1,2,3,4,5,6,7,8,9 & 10 गेट 0.5 मी ने चालू असून पुर्णा नदीपात्रात ( Spillway gate – 21100 + Hydro power 2600 Cusecs ) असा एकुण 23700 Cusecs एवढा विसर्ग पूर्णा नदीपात्रात चालू आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहान्याचे आवाहन येलदरी धरण, पूर नियंत्रण कक्ष यांनी केले आहे. दरम्यान आज पूर्णा नदी पात्रात विसर्ग सोडताना धरणाचे दरवाजे उघडतानाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

ML/ML/SL

19 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *