शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णयासाठी १० दिवसांची मुदतवाढ

 शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णयासाठी १० दिवसांची मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाबाबत अंतिम निकाल येण्यास अक्षरश: ‘तारीख पे तारीख’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलनंब प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात वेळ वाढवून मागितला होता. सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना दिलासा देत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी १० जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.

राहुल नार्वेकर यांच्यावतीनं तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा युक्तिवाद केला होता. राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र, सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.

राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाकडे बाजू मांडताना २० डिसेंबरपर्यंत निर्णय सुरक्षित ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टातील यापूर्वीच्या सुनावणीत या बाबतचा अंतिम निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांना दिला होता. आता, राहुल नार्वेकर यांना १० दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला लागत असलेल्या विलंबामुळे सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा अध्यक्षांना कडक समज देत याप्रकरणी वेळेत सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टाने ३१ डिसेंबरपर्यंत याप्रकरणी निकाल देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत. पण, त्यांनी आणखी तीन आठवड्यांचा वेळ कोर्टाकडे मागितला होता.

SL/KA/SL

15 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *