वक्फ बोर्ड कायद्यातील काही तरतूदींना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वक्फ बोर्डाबाबत नुकत्याच आमलात आलेल्या नवीन कायद्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सविस्तर सुनावणी सुरू झाली. या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. वक्फ कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकारच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. उद्या पुन्हा याबाबत सुनावणी होणार आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने न्यायालयाला दोन मुद्द्यांवर आश्वासन दिलं आहे. त्यानुसार पुढील सुनावणी होईपर्यंत नव्या कायद्यानुसार बाहेरील सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली जाणार नाही. त्याशिवाय, वक्फ बोर्डानं एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची असल्याचं जाहीर केलं असेल, तर त्यात पुढील सुनावणीपर्यंत हस्तक्षेप करणार नाही. या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली असून येत्या ७ दिवसांत केंद्र सरकारला या मुद्द्यांवर भूमिका सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
वक्फ सुधारणा कायद्याला विविध धार्मिक संस्था, विविध पक्षांचे खासदार, विविध राजकीय पक्ष आणि अनेक राज्य सरकारांकडून आव्हान देणाऱ्या 70 हून अधिक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यापैकी दहा याचिकांवर आज सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली.
SL/ML/SL
17 April 2025